About
कोंकणी मराठी डिजिटल मिडीयम (KMDM)
गोमंतकीय कला आनी सृजनशीलतेक जागतिक व्यासपीठ
१. आमचो दृष्टिकोन (The Vision)
‘कोंकणी मराठी डिजिटल मिडीयम’ (KMDM) हें केवळ एक बातमी पोर्टल नसून, गोव्यातील आणि संपूर्ण मराठी-कोकणी मनोरंजन विश्वासाठीचे एक हक्काचे ‘डिजिटल स्ट्रॅटेजी हब’ आहे. गोमंतकीय संस्कृती, कोंकणी आनी मराठी चित्रपट, नाटक, संगीत तशेंच डिजिटल कंटेंट (Content) हांकां जागतिक स्तरावर नेऊन, त्यांना योग्य ओळख आनी व्हिजिबिलिटी मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.
* आमचे ध्येय: गोमंतकीय कला, कोंकणी-मराठी आशयाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक प्रभावशाली आणि जागतिक दर्जाची ओळख निर्माण करून देणे.
२. आमचे मुख्य स्तंभ (Core Pillars)
* सर्जनशील आशय केंद्र (Creative Content Hub): चित्रपट, मालिका, नाटक आनी ओटीटी (OTT) क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रत्यक्ष आकार देण्यास मदत करणे.
* रणनीती आनी ब्रँडिंग (Strategy & Branding): गोमंतकीय आणि मराठी-कोकणी कलाकृतींना जागतिक दर्जाचे ‘मार्केटिंग’ आनी ‘ब्रँडिंग’ बळगें पुरवणे.
* कलाकारांना संधी: गोव्यातील उदयोन्मुख कलाकार, निर्माते आनी तंत्रज्ञांसाठी एक समृद्ध डिजिटल इकोसिस्टम तयार करणे.
* सांस्कृतिक संवाद: मनोरंजनाच्या माध्यमातून कोंकणी आणि मराठी संस्कृतीमधील सामाजिक-सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण वाढवणे.
* डिजिटल इकोसिस्टम: आधुनिक डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांच्या पसंतीनुसार उत्तम आशय सादर करणे.
३. पुढाकार आणि नेतृत्व
ही संकल्पना सागर मधुकर परदेशी यांच्या दूरदृष्टीतून साकारली आहे. या उपक्रमाला गोव्यातील आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांचा भक्कम पाठिंबा लाभला आहे:
* सागर मधुकर परदेशी: संस्थापक – Kreative Kidas आणि Kreative Kontent Kompany.
* रघू सेठिया: संचालक – DNA Goa; सह-संस्थापक आणि प्रवर्तक – Digital Goa Varta.
४. आमची वचनबद्धता
* पूर्णपणे गैर-राजकीय (Non-Political): हें व्यासपीठ पूर्णपणे कला, कलाकार आणि सृजनशीलतेच्या जतनासाठी आहे. यात राजकारणाला कोणताही थारा नाही.
* पारदर्शकता आणि गुणवत्ता: आम्ही गुणवत्तेशी तडजोड न करता, गोव्यातील कोंकणी-मराठी आशयाला अधिक सक्षम बनवण्यावर भर देतो.
* सहयोग (Collaboration): कलाकार, निर्माते आनी तंत्रज्ञ यांच्यासाठी हे एक मुक्त आणि स्वतंत्र व्यासपीठ आहे.
५. एकत्र येऊया, प्रगती करूया!
गोमंतकीय मनोरंजनाची ताकद, आमची समृद्ध संस्कृती आणि कला अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आम्ही आपणा सर्वांना या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन करतो. चला, एकत्र येऊन कोंकणी-मराठी आशयासाठी एक प्रबळ ‘डिजिटल आवाज’ तयार करूया!